राज्यात दिवसभरात ६० हजारावर नवे रुग्ण; चिंता वाढली !
मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ५६ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा या आकडेवारीत वाढ होऊन राज्यात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याचसोबत आज राज्यात ८५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.
आज ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८६ लाख ६१ हजार ६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ४२ हजार ७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ३९ हजार ०७५ इतकी आहे.
No comments:
Post a Comment