दहावीच्या परिक्षेसंदर्भात संभ्रम कायम ! उच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!
मुंबई : सीबीएसई, एसएससी आणि आयसीएई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केलीय.
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी बुधवारी (19 मे) संध्याकाळी सुनावणी पार पडली. तिन्ही बोर्डांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगत केवळ उद्यापर्यंतची वेळ दिली.
"16 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी महाधिवक्ता का हजर नाहीत? असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. हा विषय गंभीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. सुनावणी आता गुरुवारी होणार आहे."
तेव्हा दहावीची परीक्षा पुन्हा होणार का? मुंबई उच्च न्यायालय याबाबत काय निकाल देणार? असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. 12 मे रोजी राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे 16 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असतात.
गुरुवारी (20 मे) सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड, राज्य सरकार आणि पालक संघटना आपली भूमिका कोर्टासमोर मांडतील.

No comments:
Post a Comment