राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यू दर कायम; तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले !!
मुंबई : आज राज्यात ६ हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल १८ मेला राज्यात २८,४३८ नवीन रुग्ण आढळले होते. आज राज्यात नवीन ३४,०३१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज ५९४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०६% एवढे झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,०१,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments:
Post a Comment