राज्यात रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात घट ! रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर !!
मुंबई : राज्यात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) गेल्या तीन महिन्यांत आज प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्यात सर्वात कमी म्हणजे 13 हजार 659 कोरोना रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात कोरोनाचे 21 हजार 776 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात प्रथमच सर्वात कमी 13 हजार 659 कोरोना रुग्णांचे निदान झाले. 10 मार्च 2021 रोजी आजच्याइतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्या वाढत होती, मात्र आता कोरोना उतरणीला लागल्याचे चित्र आहे.
सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील 1 लाख 88 हजार 027 इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्यात आज 300 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर 1.71 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 14 लाख 52 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर 7 हजार 093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
No comments:
Post a Comment