स्वतःला हभप महाराज समजा-या "बुवा" कडून वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यां आणि बादलीने अमानुष मारहाण? विडिओ व्हायरल!
कल्याण, (प्रतिनिधी) : 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, मात्र स्वत कोरडे पाषाण, अशी मराठीत म्हण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव कल्याण तालुक्यातील मंलगपट्यातील व्दारली या गावात आला असून स्वतःला हभप महाराज म्हणवणाऱ्या या ढोंगी "बुवा" ने त्यांच्याच घरातील एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिक च्या बादलीने अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सध्या सोशलमिडीयावर तूफान व्हायरल होत असून हा "चालबाज" बुवा असे कृत्य करुन पोलीस यायच्या आधीच "आळंदीला" गेला हे विशेष
महाराष्ट्राला थोर साधुसंत, समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानोबा, चोखा महार, गोराकुंभार, जनाबाई, मुक्ताबाई आदी नी भक्तीचा मळा फुलविला या संतांनी वारकरी संप्रदायाची पताका अटकेपार नेली. यांच्या सर्वांसाठी पंढरीच सावळा विठूराया सर्वोच्चस्थानी. वर्षातून एकदा तरी वारीत सहभागी होऊन पांडूरंगाच्या चरणांवर माथा टेकवणे ऐवढीच काय ती इच्छा, यासाठी पवित्र अशी 'तुळशीची' माळ गळा घालून आयुष्य भक्तीमार्गासाठी अर्पण करणे हा उद्देश.
पण दुसरीकडे मात्र काही महाभाग पवित्र अशा 'तुळशीच्या माळेचे' महत्त्व विसरलेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो. की माळ घातली म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचे वाईक कृत्य करायला मोकळे, आपणास परवानगी मिळाली असे समजतात का? असेही वाटते.
याचे कारण म्हणजे कल्याण तालुक्यातील मंलगपट्यातील व्दारली या गावात राहणारा गजानन चिकनकर हा स्वतःला हभप महाराज समजतो, याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. गाव व परिसरात भजन किर्तन असले की हा बुवा तेथे भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत. पण हाच "बुवा" एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यां नी प्लास्टिक च्या बादलीने अमानुष मारहाण करतानाचा विडिओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला.या विडिओ ची सत्त्यातता पडताळणीसाठी गावातून माहिती घेतली असता या चालबाज बुवांची कुकृत्ये समोर आली.
गजानन चिकनकर या बुवाच्या २ बायका, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार, मुलगा पकवाज वाजवतो व हा किर्तन करतो. पहिल्या बायकोचे वय जास्त झाल्याने तिला घरातील कामे होत नाहीत. त्यामुळे तो हिला अमानुष मारहाण करित असे, घरातील सुना, नातवंडे, यांना देखील शिवीगाळ व मारहाण करत होता. हे रोजचेच झाल्याने शेजारी देखील वैतागून गेले होते. हा मारहाणीचा विडिओ त्याच्या नातवाने शुट करून व्हायरल केला आहे. यामध्ये अगदी लाथाबुक्क्यां, पाण्याची प्लास्टिकची बादलीने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. हे करताना आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे हे देखील तो बुवा विसरला आहे. हा विडिओ व्हायरल होताच पोलीस यांच्या घरी गेले होते. मात्र या बहाद्दराने केलेले पाप धुण्यासाठी केंव्हाच आळंदी गाठली, काय म्हणावे या बुवाला!
गेल्या दिड दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे पंढरीची वारी बंद आहे. त्यामुळे कधी एकदाची "वारीला" परवानगी मिळते. आणि त्या विठुरायाच्या चरणांवर नतमस्तक होतो यासाठी वारकऱ्यांचा जीव कंटाशी आला आहे. तर दुसरीकडे असे ढोंगी बुवा? समस्त वारकऱ्यांचे, हभपचे नाव मातीमोल करीत आहेत. आजही असे कितीतरी बुवा आहेत की जे आपल्या पत्नीला, सुनेला, मुलांना त्रास देऊन छळ करित आहे.याची कृती वानी, चारित्र्य हिन आहे.
काही प्रकार उघडकीस आला किंवा तक्रार झाली तर मी माळकरी आहे, असे करु शकत नाही, असा कांगावा करून पवित्र अशा माळेची शपत घ्यायला कचरत नाही. अशा ढोंगी बुवाच्या विरोधात समाजाने पोलिसांकडे तक्रार करायला हवी असे मत कल्याण पंचायत समितीचे उपसभापती किरण ठोंबरे यांनी व्यक्त केला. तर अशा चालबाज "बुवा" वर वारकऱ्यांनीच बहिष्कार घालावा व तुळशीच्या माळेचे पावित्र्य टिटवावे असे मत एक वारकरी वाळकू भोईर यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment