मुरबाड मध्ये काँग्रेसचे पेट्रोल-डिसेल, गॅस व खाद्यतेल यांच्या भरमसाठ दरवाढीविरूध्द दुचाकींना "दे धक्का" आंदोलन !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
आज बुधवार दि.२ जुन २०२१ रोजी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीने पेट्रोल-डिसेल, गॅस व खाद्यतेल यांच्या भरमसाठ दरवाढीविरूध्द दुचाकींना "दे धक्का" आंदोलन तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व सेवादलचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, युवकचे जिल्हासरचिटणीस गणेश देशमुख, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष भरत मुरबाडे, राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, पर्यावरणचे तालुकाध्यक्ष मदन तरे आदी पदाधिकारींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पेट्रोल-डिजेल ला लागणारे क्रुड ॲाईलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असुन ही मुरबाडमध्ये पेट्रोल १००.१७ रु तर डिजेल ९२.३७ रु यांना मिळते त्यामुळे दुचाकींना “दे धक्का" आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला व जर महागाई कमी केली नाही तर सामान्य जनता ही भाजपा सरकारला २०२४ ला सत्तेतुन धक्का देणार असल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले. खाद्यतेल २२० रु किलो व घरगुती गॅस सिलेंडर ९०० रु पर्यंत मिळत असुन गृहिणींचे महिन्याचे बजेट हुकत असल्याचे मत संध्या कदम यांनी केले. नोटबंदी व जीएसटी मुळे कोट्यावधी रोजगार गेले असुन नोकरी असणाऱ्याचे पगार मागील दोन वर्षापासुन वाढला नाही त्यातच पेट्रोल ची भाव गगनाला भिडलेला आहे त्यामुळे तरुण-तरुणींमध्ये संतापाची लाट असल्याचे प्रतिपादन गणेश देशमुख यांनी केले. सदरचे आंदोलन यशस्वी होण्यासाठी नेताजी लाटे, शुभांगी भराडे, गणेश खारे, तानाजी पष्टे, जयवंत हरड, अमोल चोरघे, आदींनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment