Thursday, 3 June 2021

राज्यात रुग्णसंख्येत घट ! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु !!

राज्यात रुग्णसंख्येत घट ! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु !!


मुंबई : करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णबाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.७३ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ३०७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय करोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...