Thursday 3 June 2021

कल्याण ला कोरोनामुक्त तालुका करण्याची संधी मात्र नाकर्ते अधिकारी व टेंडरबाज कर्मचाऱ्यांमुळे शक्यता धूसर?

कल्याण ला कोरोनामुक्त तालुका करण्याची संधी मात्र नाकर्ते अधिकारी व टेंडरबाज कर्मचाऱ्यांमुळे शक्यता धूसर?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या महामारीतून ग्रामीण भागाला सहिसलामत वाचविण्यासाठी राज्य शासनाने कोरोना मुक्त पुरस्कार योजना सुरू केली आहे. यासाठी शासनाने लाखोंच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. प्रथम गाव, नंतर तालुका, जिल्हा व अखेरीस राज्य कोरोनामुक करण्याचा शासनाची अंत्यत चांगली संकल्पना आहे. सुदैवाने कल्याण तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे हातांच्या बोटावर मोजता येतील इतके च कोरोना पेंशट आहेत. त्यामुळे थोडे अधिक प्रयत्न केले तर प्रत्येक ग्रामपंचायत कोरोनामुक होईल. पर्यायाने कल्याण तालुका कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. परंतु सध्याच्या अधिका-याची धरसोड वृत्ती, बोटचेपी धोरण प्रंसगी कठोर निर्णय घेण्याची अकार्यक्षमता, नाकर्ते पणा आणि इतर कर्मचाऱ्यांचा "टेंडर" बनविण्यासाठी जाणारा कार्यालयीन वेळ या सर्व गोष्टींचा विचार केला तर वरील शक्यता खूपच धूसर वाटते. 


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै आर आर पाटील (आबा) यांनी १५ आॅगस्ट २००७ मध्ये तंटामुक्त गाव योजना सुरू केली होती. तंटामुक्त गावांना रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. याचा अंत्यत चांगला परिणाम होवून शकडो गावे तंटामुक्त झाली होती. आता याच धर्तीवर महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोनामुक गाव ही मोहीम राबविण्याचा निश्चय केला आहे. यासाठी गावांना अनुक्रमे ५०लाख, २५ लाख आणि १५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच अशा गावांना अधिक विकास निधी मिळणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीने कोरोना मुक्ती साठी ५पथकांची स्थापना करायची असून यामध्ये कुटूंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी व रुग्णालयात भर्ती करण्यासाठी घेऊन जाणा-या वाहन चालकांचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक, आणि लसीकरण पथक, अशी पाच पथके तयार करून त्यांनी दिलेल्या कार्यानुसार काम करायचे आहे. याकरिता एकूण ५० गुण देण्यात आले आहे. यामध्ये अनेक गोष्टींची समावेश आहे जसे ग्रामस्तरावर कोरोनामुक्त समिती, यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स, स्वंयमशेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचतगट, पतसंस्था, विकास सोसायटी, आदींचा सहभाग महत्त्वाचा आहे यांच्या माध्यमातून कोरोना बाधित कुंटूबाचे सर्वेक्षण, काॅनटॅक्ट ट्रेडिंग, अन्टीजेन टेस्ट, विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, मास्क, सॅनिटायझर ची सोय, लसीकरण, लहान मुले गरोदर माता सर्वेक्षण, अनाथ मुलांचा सांभाळ आदी नुसार गुणाकंन ठरविण्यात येणार आहे.
सुदैवाने अजूनही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला आहे. काही गावांमध्ये तर एकही पेंशट नाही. परंतु काही गावात पेंशटचे प्रमाण कमी अधिक होत आहे. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीचा विचार केला तर मागील महिन्यापेक्षा मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे रुग्ण हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. त्यामुळे सर्वानीच मिळून अधिक जोमाने प्रयत्न केला तर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ह्या कोरोनामुक्त होऊ शकतील! पण सध्याची परिस्थिती पाहता ते इतके सोपे ही नाही हेही लक्षात घ्यायला हवे. 
तत्कालीन गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती सदस्य तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण या सर्वाच्याच अथक प्रयत्नाने निदान कल्याण पंचायत समितीची दुरुस्ती तरी झाली. परंतु आता काय अवस्था झाली आहे.? पावसाळा तोंडावर आला आहे, अनेक ग्रामपंचायतीचा डम्पिंग चा प्रश्न सुटलेला नाही. कच-याचे ढिग जागोजागी दिसत आहेत. नालेसफाई झाली नाही. जिथे ग्रामपंचायतीची ताकत कमी पडते, तिथे सक्षमपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर हे प्रश्न सोडवायला हवेत परंतु कल्याण पंचायत समितीमध्ये तसे होताना दिसत नाही. दस्तुरखुद्द कल्याण पंचायत सभागृह व छत भंगाराचे गोडाऊन बनले आहे. पावसाचे पाणी येथे जमा होऊन येथे डेंग्यू च्या डासाची उत्पत्ती होणार नाही का? 
लोंबकळणाऱ्या वायरी, तारा, आजूबाजूला पडलेला कचरा, साहित्य बाहेरुन येणाऱ्या साठी सॅनिटायझर चा अभाव यासह गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांचे कर्मचारी व अधिकारी यांचेवर नसलेले नियंत्रण, कठोर निर्णय क्षमतेचा अभाव, बोटचेपी धोरण, पदाधिकाऱ्यांशी समन्वयाचा अभाव, तर कर्मचारी शासकीय साधन सामुग्री चा वापर करून स्वत :च्या खाजगी लाभापायी तासनतास "टेंडर" बनविण्यात खर्ची घालणारे कार्यालयीन कामाचे तास? या सर्वाचा परिणाम म्हणजे लोकांच्या तक्रारी, विकास कामे, आणि आता कोरोना चे महासंकट याकडे लक्ष द्यायला यांना वेळ कुठे शिल्लक राहतो. यांचा गंभीर पणे विचार करायला हवा. 
सगळेच कर्मचारी काही वाईट नाहीत, कोरोनाच्या संकटकाळी वेळेवर येऊन इमानेइतबारे काम करणारेही आहेत अनेकांचा कोरोना मुळे बळी गेला आहे. परंतु काही कामचुकारांना याचे काही सोयरसुतक नाही यांना फक्त शासनाच्या खाऊन स्वतः ची सेवा कशी करुन घ्यायची याचे पडले आहे. 
पावसाळा सुरू झाला आहे अनेक ठिकाणी पुराचे, पाणी भरण्सायाची भिती आहे. धोकादायक घरे, झाडे, भिंती हि संकटे आहेतच. साथच्या आजाराची शक्यता आहे. जोडिला कोरोना आहेच अशा वेळी सक्षमपणे निर्णय घेणारा, जबाबदारी स्वीकारणारा अधिकारी हवा! तेव्हाच तालुका कोरोनामुक्त होईल? 

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...