Saturday, 5 June 2021

निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडेच्यावतीने राबवली ग्रामस्थ कोरोना चाचणी; ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद !

निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडेच्यावतीने राबवली ग्रामस्थ कोरोना चाचणी; ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद !


कोकण, (शांत्ताराम गुडेकर) :

         लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रात सर्वात पुढे असलेली व  रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वतीने निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडे गावाला जाहीर करण्यात आलेला कोरोना लढा सन्मान पुरस्कृत ही ग्रामपंचायत, ग्राम कृती दल यांसह  समस्त भडे नागरिकांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी राबवलेल्या विविध  उपक्रमाच्या आधारावर सद्या ही निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडे लांजा तालुका सह रत्नागिरी जिल्ह्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्र शासन व रत्नागिरी जिल्हाधीकारी यांच्या वतीने व आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या प्रत्येक्ष कोरोना चाचणीत आता भडे ग्रामपंचायत अग्रेसर आहे. दिनांक ३ जून २०२१ रोजी भडे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व प्रथम ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रथम (भडे मधली वाडी) येथे कोरोना चाचणीला सुरवात केली. तर या चाचणीला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. तब्बल एकाच दिवशी ७२ नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली तर या मोहिमेत भडे ग्रुप ग्रामपंचायतिचे सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर, ग्रामसेवक एस. एस. महाजन, तलाठी अपूर्वा कमलाकर सुवरे, डॉ. वि. वि. श्रोते ( प्राथमिक आरोग्यकेंद्र वाडीलिंबू) आरोग्य सेविका वाडे-  सुप्रिया पवार, कोतवाल पी.जी. दळवी, शिपाई शांताराम दळवी यांच्या अधिपत्याखाली ही कोरोना चाचणी मोहीम राबविण्यात आली. तर सर्व ग्रामस्थांचे भडे ग्रामपंचायत सरपंच श्री. सुधीरजी तेंडुलकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...