Friday, 25 June 2021

जिल्हा समाजकल्याण विभाग आणि कल्याण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने गोवेली येथे लाभार्थांना साहित्य वाटप, नागरिकांमध्ये समाधान!

जिल्हा समाजकल्याण विभाग आणि कल्याण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने गोवेली येथे लाभार्थांना साहित्य वाटप, नागरिकांमध्ये समाधान!   

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग आणि कल्याण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यामाने तालुक्यातील गोरगरिब,मागासवर्गीय समाजातील लाभार्थ्यांना जिप सेस फंडार्गत सन २०२०-२०२१ या वर्षासाठी विविध उपयोगी साहित्याचे वाटप जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती पुष्षा गणेश पाटील यांच्या  हस्ते आणि जिल्हा समाजकल्याण सभापती नंदा उघडा, कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी ऐन पावसाळ्यातही लाभार्थाचा उत्साह कमालीचा दिसून आला.


कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत १० ग्रामपंचायत हद्दीतील गरीब, मागासवर्गीय, आदीवाशी समाजातील लाभार्थांना सन २०२०/२१ वर्षासाठी जिप सेस फंडातून संतरजी,भंजनी साहित्य,भांडी, डिजे, मंडप, व्यायाम शाळा पुस्तके साहित्य,आदी साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम आज गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 


यामध्ये वेहळे, जांभूळ, पळसोली, काकडपाडा, नागाव, आणे भिसोळ, चवरे म्हसरोंडी, म्हसकळ, केळणी कोलम आदी १० ग्रामपंचायतींचा समावेश असून आज जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती पुष्षा पाटील यांच्या हस्ते लाभार्थांना साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी बोलतान त्या म्हणाल्या समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, काही छोट्या मोठ्या तृर्टी असतील त्या दूर करुन सर्वाधिक लाभार्थांना लाभ मिळवून देण्याचे अवाहन यावेळी सौ. पाटील यांनी केले, तर झेडपी सदस्या जयश्री सासे यांनी सरपंच आणि ग्रामसेवक याच्यात समन्वय असेल तर किती सुंदर काम होते हे आजचा कार्यक्रम उदाहरण असल्याचे सांगून कल्याण पंचायत समितीचे कौतूक केले. याप्रंसगी व्यासपिटावर जिल्हा समाजकल्याण सभापती श्रीमती नंदा उघडे, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे, उपसभापती किरन ठोंबरे, जिप सदस्या जयश्री सासे, रेश्मा मगर, कल्याण प स सदस्य यशवंत दळवी, रमेश बांगर, पांडूरंग म्हात्रे, सदस्या रंजना देशमुख, अस्मिता जाधव, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, गोवेलीच्या सरपंच पूजा जाधव, जांभूळचे परिक्षीत पिसाळ, काकडपाडा प्रविण चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बाळा गायकर, सचिव कोकणे, ग्रामसेवक एकनाथ विशे पत्रकार जैतू मुठोलकर, संजय कांबळे आणि लाभार्थी उपस्थित होते, या छोटेखानी सुंदर कायक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे बाहेर मुसळधार पाऊस पडत असतानाही लाभार्थांची गर्दी मोठी होती. कोरोनाचे नियम पाळत त्यांचा उत्साह ओंसडून वाहत होता, या कार्यक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...