Friday, 25 June 2021

म्हस्कळ जिल्हा परिषद शाळा कोसळली; सभापती, गटविकास अधिका-यांची पाहणी !!

म्हस्कळ जिल्हा परिषद शाळा कोसळली; सभापती, गटविकास अधिका-यांची पाहणी !!  


                 कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा म्हसकळ या शाळेचा व्हरांडा नुकताच कोसळला, सुदैवाने शाळा बंद असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, या शाळेचा पाहणी दौरा कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचोरे व गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी केला व शाळेच्या मुख्याध्यपकांना सूचना दिल्या.    


                                    कल्याण तालुक्यातील म्हसकळ येथील जिल्हा परिषदेची शाळा ही समाज विकास योजनेतून १९५४ आणि दुसरी १९७६ मध्ये बांधण्यात आली होती, इयत्ता १ ते ७ पर्यत ही शाळा असून एकूण ६ वर्ग खोल्या पैकी ४ वर्ग खोल्या या धोकादायक आहेत, गेल्या दिड वर्षापासून कोरोनामुळे हे वर्ग भरत नव्हते, ते पाडण्याचे प्रस्ताव देखील पाठविण्यात आले असून गेल्या काही दिवसापासून कल्याण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्याने नुकतीच या १९७६ मध्ये बांधलेल्या शाळेचा काही भाग कोसळला, शाळा बंद असल्याने कोणतीही हानी झाली नाही.                                 आज गोवेली येथील समाजकल्याण विभागाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाघचौरे आणि गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी या शाळेला भेट दिली व पाहणी केली, यावेळी शाळेच्या मुख्याध्यपकांना शाळेचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...