महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर अखेर गुन्हा नोंद !
कल्याण, प्रतिनिधि : आज दिनांक 24/06/2021 रोजी अरुण पारवे आणि त्यांचा मुलगा सचिन पारवे यांना इंद्रा नगर टिटवाळा येथे ऐका गुंड प्रवृत्तीच्या शर्मा आणि त्याची बायको दोघांनी जी घरात गुसून लाकडी दडक्याने अमानुष मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली याबद्दल गुंड शर्मा याच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी टिटवाळा पोलीस स्टेशन येथे भेट दिली असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांची भेट घेतली झालेल्या घटने बदल माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सूत्र हलवून महीलवर मारहाण करणाऱ्या नराधमांस अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा तयार केली पण तो पर्यंत नराधम व त्याची पत्नी पळ काढण्यास यशस्वी झाले.असता सदर घटनेची स्वरूप लक्षात घेता तत्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. सदर गुन्हा तांत्रिक अडचणी मुळे उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला
सदर आरोपीवर भा,द, स कलम ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव, ठाणे जिल्हा महिला पदाधिकारी मानवी अन्याय निर्मूलन संघटना व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुंद्रे सर व योगिता जोशी, हरीश इंगळे मा. असलम सोयान व मा आजीम साखरकर व मुस्ताक अन्सारी प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment