राज्यात रिकव्हरी रेट ९५.९३ टक्के ! पण मृत्यूदर चिंता वाढविणारा आज वाढून २ टक्के!
मुंबई : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.बुधवारी दिवसभरात राज्यात जो मृतांचा आकडा १६३ होता, तो वाढून गुरुवारी १९७ झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे.

No comments:
Post a Comment