Wednesday, 2 June 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र केतन भोज यांच्या मागणीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दखल !

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र केतन भोज यांच्या मागणीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दखल !


रत्नागिरी,(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य व्यक्तींच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे ही बाब लक्षात घेता तसेच याशिवाय अनेक पत्रकार कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रस्त्यावर उतरून वार्तांकनाचे काम निर्भीडपणे करत आहेत. अशा पत्रकारांमुळेच वास्तव बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचतात. रस्त्यावर उतरून काम करणारे पत्रकार, कॅमेरामन हे कोरोना योद्धेच आहेत. या कोरोनाच्या महामारीत अनेक पत्रकारांनी कोविडमुळे प्राण गमावले आहेत. तसेच अनेक पत्रकारांचे कुटुंबीय बाधित होऊन त्यांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे या दोन्हीही गोष्टीची मागणी आर.आर.पाटील फाऊंडेशनचे केतन भोज यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती केतन भोज यांच्या मागणीची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दखल घेत दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळे लसीकरण केंद्रे आयोजित करण्यात आलेले आहेत तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण/अडथळा होणार नाही त्यानुसार सदरची लसीकरण केंद्रे आयोजित केलेली आहेत. याशिवाय पत्रकारांकरीता लसीकरण केंद्रे हे पोलीस स्टेशन डिस्पेन्सरी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेले आहेत तसेच पुढील साठा उपलब्ध झाल्यानंतर पुढील लसीकरण सत्रे आयोजित केली जातील व त्याची माहिती प्रेस नोट द्वारे काळीवली जाईल अशी माहिती आर.आर.पाटील फाऊंडेशन तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव केतन भोज यांना पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...