Wednesday, 2 June 2021

उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे म्हणतात, “परमेश्वरालाच ठाऊक” !

उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे म्हणतात, “परमेश्वरालाच ठाऊक” !


अरुण पाटील, भिवंडी :
        मराठी माणसाच्या मुद्द्यांवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येतील अशी चर्चा नेहमीच राज्यात रंगत असते. दोन्ही नेत्यांना हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि ह्या दोन्ही नेत्यांकडून उत्तरेही तितकीच गंमतीदार मिळतात. याच पार्श्वभूमीवर, एका दिलेल्या मुलाखतीत ‘राज आणि उद्धव एकत्र येणार का?’ या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.
            राज-उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी आपले दोन्ही हात आकाशाकडे दाखवत “परमेश्वरालाच ठाऊक” असे उत्तर दिले आहे. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, “हो म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो”, असे उत्तरही राज ठाकरे यांनी झटकन दिले.
         येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कुणाशी युती करणार का ? या प्रश्नला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल असेही राज.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...