Tuesday, 1 June 2021

विरार येथील विष्णू पाटील यांनी वाढदिवस थाटात साजरा न करता केले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप.!

विरार येथील विष्णू पाटील यांनी वाढदिवस थाटात साजरा न करता केले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप.!


विरार प्रतिनिधी :- विष्णू पाटील हे विरार चे राहणारे असून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत, नवदुर्गा मित्रमंडळ विरार येथील उपाध्यक्ष असून ते नेहमी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घेतात. लॉक डाऊन मध्ये त्यांनी लोकांना सेवाभावी पध्दतीने मदत केली आहे.


१ जून रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यांनी आपला वाढदिवस थाटात न साजरा करता अत्यावश्यक सेवेतील पोलीस, महावितरण, महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप केले. वाढदिवस थाटात साजरा करणार्‍यांनी विष्णू पाटील यांकडून धडा घेतला पाहिजे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विष्णू पाटील असे म्हणाले की त्यांना ही प्रेरणा आपल्या आई वडिलांकडून मिळाली आहे, सोबत काका गजानन पाटील व भाऊ सदानंद पाटील हे सुध्दा उपस्थित होते आमचा संपूर्ण परिवार लोकांच्या अडीअडचणीत नेहमीच मदतीला पुढे असतो म्हणून अन्नदान आणि लोकांच्या सेवेसाठी नेहमी पुढाकार घेतो असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...