Wednesday 2 June 2021

ए.टी.एम. मस्ती की पाठशाला ठरतोय महाराष्ट्रातील विद्यार्थीप्रिय कार्यक्रम ! 'ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात एटीएम चा अनोखा उपक्रम रोज सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी'

ए.टी.एम. मस्ती की पाठशाला ठरतोय महाराष्ट्रातील विद्यार्थीप्रिय कार्यक्रम !

'ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात एटीएम चा अनोखा उपक्रम रोज सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी'


जळगाव, (प्रतिनिधी) : कोविड -19 या रोगाच्या च्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून शाळा वर्षभर बंद आहेत. मुलं शाळेपासून दूर आहेत. प्राथमिक वर्गयांच्या शाळाच भरल्या नाहीत. त्यामुळे मुलं अस्वस्थ आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि ते शिक्षण प्रवाहात टिकून राहावे हा विचार करत, ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (एटीएम) या राज्यस्तरीय शिक्षकांच्या समूहाने महाराष्ट्रातील मुलांसाठी एटीएम मस्ती की पाठशाला हा नावीन्यपूर्ण ऑनलाइन उपक्रम सर्वांसाठी मोफत सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना हसत खेळत नवनवीन शिक्षण मिळत आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत व त्याला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे थेट ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र या युट्युब लाईव्ह चैनलवरून कार्यक्रम प्रक्षेपित करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. मुलांच्या वयोगट, आवडीनुसार शिबीर वर्गात वेगवेगळ्या विषयांची निवड केली आहे. त्यात बाहुलीनाट्य, गोष्टी, कागदकाम, चित्रकला, इंग्लिश ऍक्टिव्हिटी, मुलाखत, आहार , आसने, प्राणायम ,विज्ञानातील गमती जमती, नृत्य ,कविता किंवा गीत गायन, अभिनय संवाद इत्यादी. विषय घेऊन मुलांना या वर्गातून आनंदासोबत, आरोग्य सुदृढ राहावे. हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम प्रत्यक्ष शाळा भरत नाही तोपर्यंत चालू ठेवण्याचा एटीएम ने ठरवले आहे. 27 मे पासून रोज सायंकाळी पाच ते सहा या वेळात सुरू झालेल्या शिबिरात चक्क दहा हजाराच्या वर विद्यार्थी सहभागी होत त्याचा आनंद उपभोगत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या वेळेत सहभागी होता येत नाही ते नंतर युट्युब वर जाऊन सर्व व्हिडीओ पाहू शकतात. जळगाव जिल्ह्यातील जवळपास हजारो विद्यार्थी यात सहभागी झालेत असे एटीएम जळगाव जिल्हा संयोजक राकेश विसपुते यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्र संयोजक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ, सहसंयोजक ज्योती बेलवले, नारायण मंगलाराम यांच्यासह  ज्ञानदेव नवसारे, लक्ष्मीकांत इडालवार, उमेश कोटलवार ,तारीख अत्तार, राकेश विसपुते, रोहिणी सोनवणे, काशिनाथ सोनवणे, नलिनी अहिरे ,कस्तुरी जोशी, शीतल झरेकर, प्रीती खंडेलवार, डॉक्टर प्राची साठे, खुर्शिद शेख ,धर्मराज करपे, उमेश नेवसे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यात 15 जून ते 29 जून शाळा पूर्वतयारी व 1 जुलै ते 30 जुलै पर्यंत उजळणी वर्ग घेऊन 1 ऑगस्टपासून पुन्हा ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ करणार आहे. असे एटीएम संयोजकांनी सांगितले.

 *समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम व जगातील सर्वात सोपी भाषा म्हणजे चित्रकला*

एटीएम मस्ती की पाठशाला या उपक्रमाचे चौथे पुष्प ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्राचे जळगाव जिल्हा संयोजक राकेश विसपुते यांनी गुंफत मुलांना साध्या सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन केले. समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम व जगातील सर्वात सोपी भाषा चित्रकला. जगात कोणीही सारखा मनुष्य नाही, तर आपली चित्रही सारखे कसे असणार?? स्वतःच्या चित्रांसोबत दुसऱ्यांच्या कलाकृतींचा आदर व कौतुक करा.चित्रातील सौंदर्य, टापटीपणापेक्षा कल्पकतेला भर द्या. खोडरबर चा वापर करूच नका. लॉक- डाऊन मध्ये घरातील असलेल्याच साहित्यांचा कलेसाठी उपयोग करत कसा आनंद घेता येतो?? याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखविले.

9850065134 (अधिक माहितीसाठी)

No comments:

Post a Comment

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग !

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग ! मुंबई - ( दिप...