आज समाधानकारक परिस्थिती; मृत्यूच्या संख्येत घट ! बरे होण्याच्या प्रमाणात वाढ !!
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार होत असल्याचे यला मिळत आहे. परंतु, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. बुधवारी २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५४ टक्के एवढे झाले आहे. तसेच बुधवारी राज्यात १५ हजार १६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ७६ हजार १८४ वर पोहोचली आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधवारी हा आकडा खाली घसरून २ लाख १६ हजार १६ इतका झाला. बुधवारी मृतांच्या संख्येतही घट झालेली यला मिळाली. बुधवारी २८५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९६ हजार ७५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment