Wednesday 2 June 2021

मनसेतर्फे साजरा होणार विचारपूस सप्ताह !!

मनसेतर्फे साजरा होणार विचारपूस सप्ताह !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर)  :

          पुढच्याच आठवड्यात म्हणजे ८ जून रोजी सौ. शर्मिलावहिनींचा, तर १४ जून रोजी मनसे कुटुंबप्रमुख आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. यावर्षी करोना- टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दिवस 'कृष्णकुंज' वर त्यांना प्रत्यक्ष भेटून साजरे करता येणार नाहीत. मग आपण काय करायचं? यावर एक उत्तम पर्या शोधला असून कुटुंबप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ठिकठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णांना फळवाटप, वैद्यकीय शिबिरं आदी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र यावर्षी हे उपक्रम राबवताना आणखी एक आगळावेगळा उपक्रम आवर्जून राबवण्यात येणार आहे. करोना महासाथीच्या निर्बंधांमुळे माणसा- माणसांत जो एक विचित्र दुरावा निर्माण झालाय, तो दूर करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठीच दिनांक ८ ते १४ जून २०२१ हा विचारपूस सप्ताह साजरा केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांत न भेटलेले मित्र- नातेवाईक, पक्षातील आपले पदाधिकारी- कार्यकर्ते, नोकरी-धंद्यातील आपली सहकारी मंडळी, आपण जिथे राहतो त्या परिसरातील नागरिक- सर्वसामान्य लोक यांची 'विचारपूस' करूया. सद्यस्थितीत त्यांना काय पटतंय, काय नाही पटत, हे जाणून घेण्यात येणार आहे. फक्त माणूस म्हणून एकमेकांशी संवाद साधाण्यात येणार आहे. एकमेकांपुढे थोडंसं मोकळं होण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. ही 'विचारपूस' करायला प्रत्यक्ष भेटायलाच हवं असं नाही. म्हणून आपण एकमेकांशी फोनवर बोलू शकतो. गुगल किंवा झूमवर गटागटानेही भेटू शकतो. एकमेकांशी संवाद साधत मानसिक आरोग्य जपू या आणि आपल्या मनसे कुटुंबाचा विस्तार करूया आसे मत मनोज चव्हाण (सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अध्यक्ष, (महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) यांनी या सप्ताह आयोजनाबाबत बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...