NCB ने इक्बाल कासकरला भिवंडी न्यायालयात केलं हजर, न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.!
अरुण पाटील, भिवंडी, दिं.25 :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला NCB ने बेड्या ठोकल्या आहेत. आज इक्बाल कासकरला भिवंडी न्यायालयात हजर केलं आहे. NCB टीम इक्बालला घेऊन भिवंडी कोर्टात पोहोचली आहे.
न्यायमूर्ती एम.एम. माळी यांच्या न्यायालयात त्याला हजर केले आहे. NCB इक्बालचा ट्रान्सिट रिमांड घेणार आहे. रिमांड मिळाल्यावर इक्बालला घेऊन NCB टीम मुंबईला जाणार आहे. भिवंडी न्यायालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर एनसीबी अटक करून इक्बाल कासकर ची अंमली पदार्थ व्यापाराबाबत चौकशी करणार आहे.
इक्बाल कासकर सेवनाकरता आणि तस्करी करता अंमली पदार्थ घ्यायचा, अशी माहिती एनसीबीनं न्यायालयात दिली. तसंच मुंबईतून इक्बालने आखाती देशात कोट्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केली असून इक्बाल शेजारील राष्ट्रात संपर्कात असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्याचे इंटरनॅशनल अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचं देखील एनसीबीचं म्हणणं आहे.
एक पोलीस व्हॅन, 1 रुग्णवाहिका आणि दोन पोलिसांच्या जीफ असा ताफा घेऊन कासकरला न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याची कोरोना टेस्ट आणि इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली.दोन दिवसांपूर्वी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) इक्बाल कासकरला अटक केली. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली.

No comments:
Post a Comment