भिवंडीतील दुगाड फाटा ते वावली रस्त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. कडून दोन कोटी रुपये मंजूर.!
अरुण पाटील, भिवंडी, दिं.2 :
भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा ते वावली या चाळण झालेल्या रस्त्यासाठी एमएमआरडीए कडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सदर हा रस्ता काँक्रीटीकरणाचा होणार असल्याने येथील नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून मुक्तता मिळणार आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अस्नोली, वावली, मानिवली ते दुगाड फाटा या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक,विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,आणि युवासेवा उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाकर पाटील यांनी सतत पाठपुरावा करून एमएमआरडीए क्षेत्रातील बाह्य रस्ते विकास योजने अंतर्गत दुगाड फाटा ते वावली मानिवली या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.त्यामुळे सदर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा होणार आहे.मात्र या कामाचा शुभारंभ कधी होणार व काम पुर्ण होण्यास किती महिने, वर्ष लगगील या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी यामुळे मात्र येथील नागरिकांची होणारी मोठी गैरसोय टळणार असल्याने नागरिकांनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment