Friday, 2 July 2021

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माझी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माझी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !                           


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि श्रींमत समजल्या जाणा-या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तालुका वारकरी सांप्रदायचे कल्याण तालुका अध्यक्ष हरिभाऊ विठू म्हात्रे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८०वर्षे होते.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीची स्थापना १९९४/९५/ मध्ये झाली, पहिल्या  सरपंच म्हणून सुमनताई खरात तर उपसरपंच पदी हरिभाऊ विठू म्हात्रे हे विराजमान झाले, यांनतर सरपंचावर अविश्वास दाखल झाल्याने उपसरपंच हरिभाऊ म्हात्रे हे सरपंच पदी विराजमान झाले, पहिल्यापासून भक्तीमार्गाकडे कल असलेले सरपंच हरिभाऊ म्हात्रे यांना सर्व 'नाना'म्हणत ,सरपंच कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे केल्यानंतर ते राजकारणातून वेगळे झाले व पुर्णवेळ 'हरी'च्या भक्तीत वाहून गेले. त्यांच्या नावापुढे सरपंच ऐवजी हभप असे लावले जाऊ लागले. या काळात ते कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष झाले.


म्हारळ गावात म्हात्रे कुंटूंब अंत्यत मोठे असून भाऊ, मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा पांडूरंग हरिभाऊ म्हात्रे यांनी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले आहे, तर त्यांची सून म्हारळ ग्रामपंचायतीची सदस्या आहे. अशा या मोठ्या परिवारातील 'नाना'हे सर्वांना पितृतूल्य असेच होते, नुकतेच दु:खद निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे इतके होते, त्यांच्या निधनाने म्हारळ गावावर शोककळा पसरली असून कल्याण तालुका वारकरी सांप्रदायचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे असे वारक-यांनी भावना व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !! मुंबई, दि. ९...