राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार कायम ! मृत्यूचा दर नियंत्रित होणे अपेक्षित !
मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यांत ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ९ हजार १९५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ८ हजार ६३४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५८,२८,५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तर दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.०१ टक्के इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात २५२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment