Thursday, 1 July 2021

तिडे तळेघर गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा हि बससेवा कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुनश्च सुरू !

तिडे तळेघर गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा हि बससेवा कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुनश्च सुरू !


नालासीयारा : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले होते त्यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, जिल्हाबंदी, असे अनेक उपाय अंमलात आणले. त्यामुळेच सर्व जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा बंद करण्यात आली. हळूहळू महाराष्ट्र सरकारच्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला व नियम शिथिल करण्यात आले. याचमुळे मध्यंतरी बंद केलेली मंडणगड नालासोपाऱा बससेवा पून्हा सुरू करण्यात आली.

ही बससेवा मंडणगड येथून सं १३.२९ वा सुटून  केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, म्हाप्रळ, चिंबाव, तुडील, महाड, टोळ फाटा, लोणेरे, माणगांव, ईंदापुर, कोलाड, नागोठणे, वडखल, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ जुईनगर, कळवा नाका, ठाणे, खोपट, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथे ९.३० वा पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथुन स. ०६:२९ वा सुटणार आहे. 
      या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक सुनिल भोकरे साहेब, यंत्र अभियंता प्रमोद जगताप, विभागिय वहातुक अधिकारी अनिल मेहत्तर, अनंत जाधव, सचिन सुर्वे, मंडणगड आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे, विभागिय सहायक कार्यशाळा अधिक्षक वासुदेव पवार, ग्रामपंचायत तिडे तळेघर उपसरपंच दादा पांढरे, मोहला अध्यक्ष बशिर खलफे, तंटामुक्त अध्यक्ष दिलावर  वलेले, कल्याण  सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती,पुणे कल्याण सावंतवाडी समन्वय समिती कल्याण गृपचे  संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष  श्री वैभव बहुतुले, शिवसेना तालुकाप्रमुख, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक, नोकरदार वर्ग, आदी मान्यवरांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...