कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड तालुक्यातील शिरवली गावातील विधवेच्या नावावर असलेल्या रेशन दुकानात येणा-या धान्यांचा मोठ्या प्रमाणात अपहर होत असल्याच्या तक्रारी तहसिलदांराकडे झाल्यानंतर याची चौकशी करुन हा अहवाल जिल्हा पुरवठा अधिका-यांना प्राप्त होताच अचानक दुकानाला भेट दिली असता दुकानदार मारुती दळवी दोषी आढळून आल्याने त्याचा दुकान परवाना रद् करण्यात आला,या धडक कारवाईमुळे इतर दुकानदारामध्ये खळबळ उडाली आहे,
मुरबाड तालुक्यात १९६ रेशनिंग दुकाने आहेत, यापैकी १९ दुकाने ही खरेदी विक्री संघाकडे, ५५ दुकाने महिला बचत गटाकडे उर्वरित दुकाने ही आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन मळावे म्हणून ३५/४० दुकानदारांनी लिलाव करुन तसे हमीपत्र तहसिलदारांना देऊन सुरु केली आहेत.
असेच मुरबाड म्हसा रोडवरील शिरवली येथील विमल पांडुरंग घागस या विधवेच्या नावावर असलेले रास्त भाव दुकान मारुती दळवी हा चालवत होता. विशेष म्हणजे हा इतर चार दुकाने चालवत असून याच्याकडे सरकारचे कोणतेही अधिकारपत्र नसताना अधिका-यांच्या संगणमताने रास्त भाव दुकान आँनलाईन असताना हा आँफलाईन चालवत होता, त्यामुळे या दुकानाविरोधात तक्रारी झाल्या होत्या,या अनुषंगाने पुरवठा निरिक्षक स्मिता फडाळे यांनी या दुकानाला भेट दिली, सरकारकडून मोफत येणारे धान्य जाते कुठे? असा जाब विचारताच, दुकानात आजपर्यत किती धान्य आले,किती कार्डधारकांना वाटप केले, याचे नोंद रजिस्टर उपलब्ध नव्हते, तसेच साठा रजिस्टर, शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणा-या पावत्यांचे रजिस्टर, सरकारची नियमावली, स्थानिक दक्षता कमिटी पथक, मालाचे नमुने दर्शविणारी भांडी, अशा कोणत्याही गोष्टी दुकानात आढळल्या नाहित, तसेच ३१ शिधापत्रिका तपासून त्या कार्डधारकांचे जबाब नोंदवले. त्यापैकी १८ जणांना अल्प प्रमाणात धान्य दिले तर १३ जणांना धान्यच मिळाले नाही, साखर तर येथे येतच नाही,या सर्व मुद्यांची चौकशी करत असताना दुकान सांभाळणारे मारुती याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले.
या बाबतचा अहवाल मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांनी पुढील कारवाई साठी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांच्याकडे पाठवला, त्यामुळे गोरगरिबांच्या धान्यांचा अपहार होत असल्याचे सिध्द झाल्याने त्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला व दुकानाचा परवाना रद् केला, तर या अगोदरही त्याचेवर निंलबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
*प्रतिक्रीया-या रास्त भाव दुकानाविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या त्या अनुशंगाने तपासणी केली असता त्यामध्ये तथ्थ आढळून आले तसा अहवाल तहसिलदांराकडून प्राप्त होताच कारवाई करण्यात आली,- राजू थोटे (जिल्हा पुरवठा अधिकारी)

No comments:
Post a Comment