डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिवेटप्पा आयोजित केशव लक्ष्मण जाधव प्रथम स्मृती दिनी स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन !!
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिवेटप्पा (रजि.) सदर समितीच्या माध्यमातून आयोजित कालकथित केशव लक्ष्मण जाधव तथा के. एल. जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिन वर्षा निमित्त अभिवादन सभा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक ११.०७.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मुक्काम - बोर्ली पंचतंन, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा- रायगड या ठिकाणी करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम कोविड १९ पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मा. श्रीकांत तळवटकर अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन मा. किशोर मोरे कार्याध्यक्ष- बौद्धजन पंचायत समिती,) यांचे हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला पुढील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मा.सुरेश जाधव उपाध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. मा.मोहन चिरणकर जेष्ठ समाज सेवक, श्रीवर्धन. मा.रंजना तळवटकर ट्रस्टी - घन:श्याम तळवटकर एज्युकेशन सोसायटी मा.रवींद्र मोरे माजी करनिर्धारन अधिकारी म.न.पा. मा.महम्मद भाई मेमन रायगड जि. नियोजन समिती वि.नि. सदस्य मा. डॉ.संजय खैरे लेक्चरर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वडाळा. मा. विश्वास भावेकर उपाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. मा. नथुराम चोगले उद्योजक मा. श्रीनिवास नागावकर अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती, शाखा दिवेटप्पा.

No comments:
Post a Comment