Saturday, 3 July 2021

रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिटकवून लसीकरण जनजागृती.!

रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिटकवून लसीकरण  जनजागृती.!


चोपडा वार्ताहर,:

लोकांना लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब चोपडा कडून ऑटो रिक्षा व एसटी बसेस वर बॅनर लावण्यात आले आहे.
 
जेव्हापासून देशात सर्वत्र कोरोना साथीचा रोग सुरू झाला तेव्हापासून रोटरी क्लब चोपडा केंद्र सरकारने जारी केलेल्या कोरोनाव्हायरस मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे, कोरोना काळात रोटरी क्लब तर्फे ५००० मास्क चे वाटप, कोविड १९ पासून संरक्षण व उपाययोजना संदर्भात चौकात बॅनर्स लाऊन जनजागृती, मागील वर्षी ऑक्सिजन पाइप लाईन साठी केलेली भरीव मदत, ३ ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर मशिन्स चे मा.तहसीलदार अनिल गावित साहेबांचा हस्ते लोकार्पण केले, कोरोनातून डिस्चार्ज झालेल्या पेशंट साठी चोपडा रोटरी च्या माध्यमातून फाऊलर बेड, वाकर, एअर बेड, वॉटर बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, ट्रायपॉड, ट्रायपॉड स्टिक,ऑक्सिजन मशिन्स  आदी साहित्य उपलब्ध करून दिले. कोरोना काळात सुध्धा अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब चोपडा अग्रेसर राहिली आहे.

प्रशासनातर्फे सर्वत्र लसीकरण सुरू झाले आहे परंतु सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या चुकीच्या संदेशांमुळे मोठी लोकसंख्या लसी घेण्यास अजूनही तयार नसल्यामुळे, रोटरी क्लब  चोपडा यांनी लोकांना व्हायरसची लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठीच नव्हे तर कोविड -१९ विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून "आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!", "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !" या आशयाचे घोषण वाक्य असलेले रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिकटवून लसीकरण बाबत जनजागृती करीत आहे, जेणेकरून कोरोनाव्हायरस चा प्रसार होण्यास आळा बसेल. 

कार्यक्रमास चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. अवतरसिंह चौहान व चोपडा बस आगार चे व्यवस्थापक मा.संदेश क्षीरसागर साहेब  यांचा हस्ते ३ रिक्षांवर व बसेस वर पोस्टर लावून या अभिनव उपक्रम सुरवात करण्यात आली. सादर कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, मानद सचिव ॲड.रूपेश पाटील, प्रफुल गुजराथी, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, चेतन टाटिया व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...