शालेय पोषण आहार अनुदान डी बी टी द्वारे पालकांच्या खात्यात जमा करावी : राजेश सुर्वे
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : उन्हाळी सुट्टीतील एप्रिल व मे महिन्यातील शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना दिले असलेले अनुदान डीबीटी द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्या ऐवजी पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे लेखी निवेदन राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने मान. शिक्षण संचालक साहेब (प्राथमिक) पुणे यांना दिले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी दिली.
मागील वर्षी कोविड 19 काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून न देता कोरडा शिधा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार सन 2020 -21या वर्षातील सुट्टीच्या कालावधीतील पोषण आहार अंतर्गत कोरडा शिधा वाटप न करता त्या ऐवजी सुट्टीतील कालावधीतील म्हणजे एप्रिल व मे महिन्याचे शालेय पोषण आहाराचे अनुदान डी.बी.टी. द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्याबाबत मान. शिक्षण संचालक साहेब प्राथमिक पुणे यांनी निर्देश दिले आहेत.
कोरोनाची तिसरी लाटेचा प्रामुख्याने प्रभाव लहान बालकावर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून सूचित केले असताना, बँकेत प्रत्यक्षात खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन जाणे, बँकेत गर्दी निर्माण करणे, आधार कार्ड संलग्न करण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी निर्माण करणे, आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक आहे, कोविड19 काळात पालकांचा रोजगार बुडालेला असताना मानधना करिता नव्याने विद्यार्थ्यांची बँक खाते उघडणे व ते आधार शी लिंक करणे हे आर्थिक दृष्ट्या पालकांनाही न परवडणारे आहे, बँक खाते उघडण्यासाठी आधार लिंक करण्यासाठी आपला रोजगार बुडवून दुर्गम भागातील पालकांना विध्यार्थी घेऊन बँक व आधार केंद्र असलेल्या मोठ्या गावात प्रवास करून जावे लागणार आहे, ही परिस्थिती विचारात घेऊन विध्यार्थ्या ऐवजी डी बी टी योजनेने रक्कम पालकांच्या बँक खात्यावर जमा करावी असा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मान. श्री राजेश सुर्वे सर यांच्या नेतृत्वात, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के कोषाध्यक्ष संजय पगार, संघटन मंत्री सुरेश दंडवते, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, राज्य सहसंपर्कप्रमुख दिलीप पाटील राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार डॉ सतपाल सोवळे प्रकाश चतरकर संजय शेळके राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर पुरुषोत्तम काळे कार्यालयीन मंत्री भगवान घरत, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन देवके आदींनी केल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:
Post a Comment