Thursday, 19 August 2021

पालकमंत्री, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या आवाहनास प्रतिसाद ! "पूरग्रस्त भागातील महिलांना तुळजाभवानी मंदिर संस्थान पाठविणार २५ हजार साड्या"

पालकमंत्री, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या आवाहनास प्रतिसाद !
"पूरग्रस्त भागातील महिलांना तुळजाभवानी मंदिर संस्थान पाठविणार २५ हजार साड्या"


सोलापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या २५ हजार साड्यांची मदत पूरग्रस्त भागामधील महिलांना पाठवण्यात येणार आहेत. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या २५ हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या २५ हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना राज्यातील सर्वच भागातून मदत पाठवण्यात आली. अन्नधान्य, कपडे, जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तुळजापूर मंदिर संस्थानकडून 10 ऑगस्ट 2021 पर्यंत शिल्लक असलेल्या एक हजार नऊवारी आणि २४ हजार सहावारी साड्यांचे नग पूरग्रस्त महिलांसाठी मदत म्हणून पाठवण्यात येणार आहेत. या सर्व साड्या रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...