सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला !
पुणे : दापोली मंडणगड गोरेगाव माणगाव पुणे चिंचवड या बससेवेच्या मार्गावरील आंबेत पुल खुला झाल्याने दि. १९ ऑगस्ट पासून बदल करण्यात आला आहे. ही बससेवा दापोली दु. ०२.३० वा सुटून खेर्डी, करंजाणी, पिसई, सोंडेघर, पालगड, शिरखल, चिंचाळी, विसापुर, मुगिज बाग, दहागाव, कुंबळे, केळवत, मंडणगड, म्हाप्रळ, आंबेत, पुरार, श्रीवर्धन फाटा, गोरेगाव, लोणेरे, माणगाव, निजापुर, भागाड, ताम्हाणी, मुळशी, पौड, पिरंगुट, वणाज, स्वारगेट पुणे, पुणे स्टेशन, पिंपरी चिंचवड (वल्लभनगर), येथे २३.०० वा पोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरीता पिंपरी चिंचवड (वल्लभ नगर) येथुन स.०६:३० वा सुटणार आहे. मार्गात बदल केला असलेने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रशासन आगार व्यवस्थापक दापोली आगार, विभागीय नियंत्रक सुनील भोकरे, अनंत जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर, सचिन सुर्वे कडून तसेच पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले, कोकण एस टी प्रेमी ग्रुपचे उपाध्यक्ष श्री विकास गुरव कडून करणेत आले आहे.
No comments:
Post a Comment