उल्हासनगर-म्हारळ सीमेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साकारतय प्रवेशव्दार, भीम अनुयायांचे स्वप्न पूर्णत्वाकडे !!
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या कित्येक वर्षांपासून अपुर्ण असलेले बौद्ध भीम अनुयायांचे स्वप्न अखेरीस पुर्णत्वाला येत असून कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने उल्हासनगर म्हारळ सीमेवर महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रवेश व्दाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पुर्ण होताच मोठ्या जल्लोषात यांचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिका-याकडून सांगण्यात आले.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते, एकूण१७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आजमितीस लाखाच्या घरात गेली आहे. कल्याण नगर महामार्गाच्या शेजारी व उल्हासनगर शहराला लागून असल्याने या ग्रामपंचायतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अनेक छोटे मोठे उद्योग धंदे येथे सुरू झाल्याने हे एक मीनी शहर बनले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढ्या सोईसुविधा पुरविणे हे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. तरीही सरपंच, उपसरपंच सदस्य जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात.
सध्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी ची सत्ता आहे, यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीत सर्व जातीधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. येथील वार्ड क्रमांक एक मध्ये प्रामुख्याने भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. तसे प्रत्येक प्रभागात कमी अधिक संख्येने आहेत, परंतु येथे जास्त प्रमाणात असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी या अनुयायांची होती. प्रांरभीच्या काळात हे काम रखडले होते. परंतु सत्तेत महाविकास आघाडी येताच भीम अनुयायांचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रवेशद्वारचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले. आतापर्यंत याला साडेचार लाख रुपये खर्च आला असून पुढे सुशोभीकरणासाठी ३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतीत येथील सदस्य एँड दीपक आहिरे यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात येईल असे अश्वासन देण्यात आले होते. पण आजपर्यंत ते पुर्ण झाले नाही. परंतु मी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाताना हे अश्वासन दिले होते व ते पाळले, तर सरपंच प्रगती कोंगिरे व उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख म्हणाले, सर्व जातीधर्माच्या लोकांची व डॉ बाबासाहेबांना मानणाऱ्या नांगरीकांची इच्छा होती की, भव्य असे प्रवेशद्वार उभारुन त्यास महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन त्यांच्या प्रति असलेली कृतघ्नता व्यक्त करून त्यांच्या स्मृतीना उजाळा देऊन आम्हाला प्रेरणा मिळावी.असे त्या म्हणाल्या. हा अंत्यत जिव्हाळयांचा प्रश्न असल्याने सरपंच प्रगती कोंगिरे, उपसरपंच अश्विनी देशमुख, सदस्य प्रकाश चौधरी,किशोर वाडेकर, मोनिका गायकवाड, वेदिका गंभीरराव, मंगला इंगळे, निलिमा म्हात्रे, बेबीताई सांगळे आणि ग्रामविकास अधिकारी वाघचौडे यांनी मोलाचे सहकार्य केले असेही ॲड. दीपक अहिरे यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरचं उल्हासनगर व म्हारळ सीमेवर हे भव्य असे प्रवेशद्वार साकार होणार आहे व ते म्हारळ गावाचे एक प्रतिक ठरणार यात शंकाच नाही.
No comments:
Post a Comment