Thursday, 19 August 2021

सांस्कृतिक कला मंडळ,रायगड मार्फत कलावंताना आधार !! "महाड - पोलादपूर येथील चाळीस पूरग्रस्त कलावंताना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप"

सांस्कृतिक कला मंडळ,रायगड मार्फत कलावंताना आधार !!

"महाड - पोलादपूर येथील चाळीस पूरग्रस्त कलावंताना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप"


मुंबई, (दिपक कारकर) :

कोकणावरील संकट म्हणजे नुकताच आलेला महापूर यातून अगदी जवळच्याच महाड -पोलादपूर तालुक्यातील ती काळजाचं पाणी करणारी दृश्य पाहिली अनेकांची स्वप्ने वाहून त्या भयान काळरूपी डोंगरा खाली अडकून राहिली. या भयानक दुर्घटनेत काही कलावंत देखील परिस्थितीशी दोन हात करत होते. आपल्या बांधवांना या दुःखातून सावरण्यास, त्यांच्या नव्या संसाराची उभारणी करण्यास आपलं मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून यथाशक्ती त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, आपले कलावंत म्हणून सांस्कृतिक कला मंडळ रायगड तर्फे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला राम टेंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाय मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र दामा, सचिव - ज्ञानदीप भोईनकर, सहसचिव शाहिर शंकर जाधव, रोहा तालुका अध्यक्ष चंद्रकांत थोरवे, रोहा तालुका समिती सल्लागार सुरेंद्र जाधव व मंडळातील सदस्य आणि कलावंत या उपक्रमाला उपस्थित होते. एक कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराची व्यथा जाणणाऱ्या या मंडळाचे व स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...