मितेश जैन यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!
कल्याण - रायगड जिल्हात होणाऱ्या अभिमान महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय पुरस्कार २४ ऑक्टोबर रोजी होणार असून कल्याण क्रीडा क्षेत्रातील युवा मितेश जैन यांना ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध कला, क्रीडा, शैक्षणिक इ. क्षेत्रातुन उत्कृष्ट व कौशल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, महिला, मुले यांना महाराष्ट्राचा गौरव हा पुरस्कार देण्यात येत आहे.
ॲथलेटिक्स मध्ये मितेश जैन यांनी इंडिया मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, जिल्हास्तरीय या स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेता, एनसीसी मध्ये सलग दोन वर्ष बेस्ट इन स्पोर्ट्स, कॉलेज स्तरावर पाच वर्ष ॲथलेटिक्स स्पर्धेत सुयश, तसेच एम. जे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रशिक्षक असून तीन खेळाडू यांचे राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी , तसेच कोरोणांमध्ये दोन वर्ष फिटनेस चॅलेंज स्वीकारून अनेक विद्यार्थ्यांना व योगा प्रेमींना त्यांनी योगा प्रशिक्षण दिले आहे. कल्याण डोंबिवली मधील विविध क्रीडा क्षेत्रामध्ये ते कार्यरत असून त्यांनी अनेक जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन केले आहे. त्यांना या अगोदरही अनेक संस्थांचे पुरस्कार भेटले आहेत. त्यांना भेटलेल्या या पुरस्कारा बदल त्यांचे विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment