Friday, 20 August 2021

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला म्हारळ वरप-कांबा परिसरातून चांगला प्रतिसाद !!

केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला म्हारळ वरप-कांबा परिसरातून चांगला प्रतिसाद !!


कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या कपिल पाटील यांना मोदी सरकार मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री म्हणून संधी मिळाल्या नंतर पहिल्यादां त्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यात्रेस म्हारळ, वरप,कांबा या परिसरातून अंत्यत चांगला प्रतिसाद मिळाला. याचे सर्व श्रेय या भागाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांना मिळते. त्यांनी केलेल्या पुर्वतयारी मुळे हा संपूर्ण परिसर भाजपा मय  झाला होता.


कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप,कांबा ही गावे उल्हासनगर विधान सभा मतदारसंघात समाविष्ट असून या भागाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार कुमार आयलानी यांनी या गावांना वा-यावर सोडले होते. कोरोनाकाळात तर या भागाकडे आमदार महाशयांनी अक्षम्य दुर्लक्ष केले होते. अशातच पुन्हा या परिसराला पुराचा फटका बसला होता, त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला होता. अशा अंत्यत अडचणीच्या  वेळी या भागाचे म्हारळ ग्रामपंचायत चे सदस्य योगेश देशमुख यांच्या कडे या परिसराचे मंडल अध्यक्ष ही जबाबदारी आली. आणि ते ताबडतोब कामाला लागले. प्रथम त्यांनी आमदार कुमार आयलानी यांना या भागाचा दौरा करायला लाऊन लोकांचे प्रश्न, अडचणी, समस्या, जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे काही प्रमाणात लोकांची नाराजी दुर झाली. तोच ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या कपिल पाटील यांना मोदी सरकार मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री पद मिळाल्याने आंनदात भरच पडली,


मंत्री कपिल पाटील यांच्या कडून आपल्या परिसरातील अनेक प्रश्न सोडवीता येतील यासाठी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेची जोरदार तयारी मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी केली. संपूर्ण म्हारळ, वरप कांबा परिसर भाजपा मय केला, कल्याण मुरबाड महामार्गावर तर अशी एकही जागा शिल्लक नव्हती की जिथे जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करणारे बँनर नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. एकूणच काय तर केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला अंत्यत चांगला प्रतिसाद मिळाला. आता अपेक्षा इतकी च आहे की या भागाचे प्रश्न देखील असेच तत्परतेने सुटावेत,या यात्रेत परिसरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...