पत्रकार विश्वास गायकवाड यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयास दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ इंगोले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक अनावरण !!
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : गुरुवार दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी पत्रकार विश्वास गायकवाड यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयास प्रदान केलेल्या महापुरुषांच्या अर्थात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉ प्रदिप इंगोले आणि पत्रकार विश्वास गायकवाड यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सन्मान पूर्वक अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय माणगांवचे वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉ प्रदिप इंगोले,श्रीमती राठोड मॅडम मेट्रेन, श्रीमती बाणे मॅडम सिस्टर्स इनचार्ज, श्री विश्वनाथ टावरी केस पेपर लिपिक, श्री प्रदीप देवरे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, श्री राज वाठोरे ब्रदर, श्री विवेक नितनवरे सुरक्षा रक्षक, श्री नितीन गायकवाड सुरक्षा रक्षक, श्री शशिकांत महाडीक कक्ष सेवक, श्री नागेश दिपके कक्ष सेवक, श्री तेडगुरे मामा कक्ष सेवक, श्री चांदोरकर मामा कक्ष सेवक, पत्रकार विश्वास गायकवाड आणि अविष्कार गायकवाड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment