रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्तांना महाड पोलादपूर माणगाव दरडग्रस्त निधी संकलन समितीकडून आर्थिक मदत !!
'चाकरमान्यांनी जमा केलेल्या निधीचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते दरडग्रस्तांना निधीचे वाटप'
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या चाकरमान्यांनी एकत्र मिळून जमा केलेल्या निधीचे गुरुवारी महाड पोलादपूर मधील दरड कोसळून घरे गमावलेल्या व मृतांच्या नातेवाईकांना निधीचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटना मध्ये एकूण ४८ जणांचा मृत्यू झाला होता. महाड मधील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व साखर सुतारवाडी येथे दरड कोसळून अनेकांची घरे दरडी सोबत वाहत गेली.
या दरडग्रस्तांना मदतीचा माणुसकीचा हात मिळण्यासाठी " एकमेका साहाय्य करू " या संकल्पनेतून महाड पोलादपूर माणगाव दरडग्रस्त निधी संकलन समिती तयार करून समितीचे प्रमुख सुभाष पवार, किशोर जाधव यांच्या हाकेला साद देत समितीकडे तालुकावासी व मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीतून निधी जमा करण्यात आला. या निधीचे गुरुवारी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते महाड मधील तळीये गावातील ३० दरडग्रस्तांना निधीचे वाटप केले.
त्यानंतर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावातील १३ व साखर सुतारवाडी मध्ये १३ व इतर ६ कुटुंबांना अशी एकूण ६२ कुटुंबांना मिळून एकूण अकरा लाख दहा हजार रुवयांच्या आर्थिक मदतीचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते दरडग्रस्ताना निधी वाटप करण्यात आला. यावेळी साखर सुतारवाडी मधील पूजा चव्हाण या मुलीचे आई वडिलांनी लग्न कार्यासाठी मेहनतीने बनवून ठेवलेले दागिने दरडीमध्ये वाहून गेल्याने चव्हाण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. पूजा चव्हाण या मुलीच्या संपूर्ण लग्नाची जबाबदारी समितीचे सदस्य तसेच माजी पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी घेतली आहे. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे , समितीचे प्रमुख सुभाष पवार, किशोर जाधव, प्रमोद गोगावले, निलेश अहिरे, तुळशीराम पोळ, रमेश शिर्के, गेनू मालुसरे, राम साळवी, कृष्णा कदम, दगडू बागवे, चंद्रकांत साळेकर, अभिषेक मोरे, ज्ञानेश्वर मोरे, संजय उतेकर, मोहन वाघमारे, सीताराम पवार, दत्ताराम पवार, सखाराम भोसले आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment