Sunday, 15 August 2021

देवदूत सचिन खेडेकर व गणेश मालुसरेचा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार !

देवदूत सचिन खेडेकर व गणेश मालुसरेचा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार !


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) :

            पोलादपूरचे उद्योगपती सचिन खेडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश ज्ञानोबा मालुसरे यांचा स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा २२ जुलै रोजी पोलादपूर तालुक्यात विक्रमी मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी केवनाळे व साखर सुतारवाडी या गावात दरड कोसळून चार घरांचे नुकसान झाले. सुतारवाडीत ६ तर केवनाळे येथे ५ माणसे जागीच मृत्यमुखी पडली तर अनेकजण जखमी झाली होती. 

"गणेश मालुसरे यांनी चिखलात मृतदेह शोधण्यापासून ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची कामगिरी पार पाडली." तर केवनाळे गावातील १४ वर्षीय साक्षी ही नवव्या इयत्तेत शिकणारी उदयोन्मुख खेळाडू दीड वर्षीय लहान मुलाला वाचविताना जबर जखमी झाली होती. सावित्री नदी पात्र सोडून तिच्या मार्गातील भूप्रदेशाचे प्रचंड नुकसान करीत दुथडी भरून वाहत होती, अशा परिस्थितीतही "चाळीचाकोंड येथील रहिवासी आणि उद्योगपती सचिन कोंडीराम खेडेकर" यांनी धाडस दाखवीत आपली चार चाकी गाडी घेऊन केवनाळे या दुर्गम ठिकाणी गेले, आणि परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन साक्षीला प्रथम पितळवाडी येथील आरोग्य केंद्रात व त्यानंतर पोलादपूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहोचवले.

केवनाळे येथून कोणतेही वाहन नसल्याने सचिन हे तिथे पोहोचले नसते तर उपचारअभावी साक्षी प्रचंड रक्तस्त्राव होऊन जीवानिशी गेली असती. त्यामुळे मुंबईच्या केईएम हॉस्पिटल पर्यंत तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. प्रसारमाध्यमांवर हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर यांनी तिची भेट घेत कृत्रिम पाय बसवण्यासाठी येणाऱ्या अंदाजे १२ लाख रुपयांच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.

No comments:

Post a Comment

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार ! पुणे, स्नेहा उत्तम मडावी - खेड येथील र...