Monday, 16 August 2021

सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू- सुंदर डांगे

सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू- सुंदर डांगे


कल्याण, प्रतिनिधी : आपल्या देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन आज साजरा केला जात आहे परंतु सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा सर्वसामान्याना कितपत फायदा होतो हे सर्वश्रूत आहे, विशेषकरून अशिक्षीत व कष्टकरी लोकांना सरकारच्या योजनांचा फायदाच मिळत नाही याचा आवर्जून उल्लेख केला जातो. 


सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्य करणारे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे व संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख सिद्धांत जोगदंड यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य लोकांसाठी सरकार दरबारी लागणारे कागदपत्रे, जनधन खाते व इतर अनेक प्रकारच्या शासकीय योजनांसाठी लागणारे कागदपत्र इत्यादी विविध कामे करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन माननीय उत्तमदादा म्हस्के, मा. विजयकुमार हनवते, म्हारळ ग्रामपंचायतचे निलेश देशमुख, अॅड. आहेरे साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष सुनिल धोडे, प्रवासी संचार चे संपादक मा. जगन्नाथ जावळे, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता राठोड, सत्यभामा जैस्वाल, जनसेवक संतोष मिरकुटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


सर्वसामान्य नागरीक हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे, सर्वसामान्य अशिक्षित कष्टकरी लोकांसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या हेतूने आपले सरकार सेवा केंद्र सूरू करत असल्याचे याप्रसंगी बोलतांना 'भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे' यांनी सांगीतले.


सदैव समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा ही तळागाळात वावरणाऱ्या संवेदनशील मनालाच होते असे गौरवोद्गार याप्रसंगी उपस्थित असलेले 'मा. विजयकुमार हनवते' यांनी काढले.

संस्धेच्या माध्यमातून समाजातील महिलांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असून, विधवा व निराधार माता भगीनींसाठी गृह उद्योग सुरू करण्याचा मनोदय याप्रसंगी बोलतांना 'सौ कलावती डांगे' यांनी व्यक्त केला.

सामाजिक दृष्टिकोनातून सुरू केलेल्या कार्याला लोकांचा प्रतिसाद मिळत राहतो, प्रबळ इच्छाशक्ती व अथक परिश्रम याच्या बळावर आपण आपले धेय्य गाठु शकतो असे विचार 'उत्तमदादा म्हस्के' यांनी मांडले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक नागरीक व इतर मान्यवर उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार ! पुणे, स्नेहा उत्तम मडावी - खेड येथील र...