स्वातंत्र्यदिनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर दे धडक बेधडक आक्रोश आंदोलन !.
"""""""""""""""""""""""""""
आंदोलकांची अवहेलना करणा-या कार्यकारी अभियंता हर्षल यादव, यांच्या पत्रकाची जाहिर होळी.
"""""""""""""""""""""""""""
अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत संबंधितांची येत्या दोन आठवड्यात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू. "पालकमंत्री उदय सामंत" यांचे ठोस आश्वासन
""""""""""""""""""""""""""
*_पालकमंत्री उदयजी सामंत,जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय देतील.असा आम्हाला विश्वास आहे मात्र न्याय मिळाल्या शिवाय यापुढे अरुणा प्रकल्पावर कोणतेही काम होणार नाही.भले आमचे बलिदान गेले तरी त्याची पर्वा नाही_*
*तानाजी कांबळे*
*अध्यक्ष* लढा संघर्षाचा,अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तीत्वाचा
वैभववाडी प्रतिनिधी -:
अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करून धरणाच्या पाण्यात पाणीसाठा केल्याने प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे तब्बल तीन वर्षे अरुणा प्रकल्पात बुडालेली आहेत. या व इतर प्रश्नांसाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या दे धडक बे धडक आक्रोश आंदोलनाची दखल घेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व येत्या दोन आठवड्यात प्रकल्पावर मिटींग घेऊन प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलकांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची अवहेलना करणाऱ्या कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांच्या पत्राची आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर होळी केली.
अरुणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, बेकायदेशीर घळभरणीची चौकशी झालीच पाहिजे, प्रकल्पात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही, कार्यकारी अभियंता हर्षल यादव आणि प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरणाऱ्या आगलावे निलंबित झालेच पाहिजेत. तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यावर शांताराम नागप आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आदी घोषणा नी जिल्हा मुख्यालय ओरोस परिसर आखवणे, नागपवाडी, भोम गावच्या प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी स्वातंत्र्यदिनी दणाणुन सोडला होता.
पालक मंत्री उदयजी सामंत,जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आक्रोश आंदोलनस्थळी भेट दिली व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तीत्वाचा संघटणेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेकरी अजय नागप, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत, खजीनदार विलास कदम यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व समस्या मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांचे समोर प्रभावीपणे मांडल्या.
पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व समस्या ऐकून घेतल्या त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या दोन आठवड्यात अरुणा प्रकल्पस्थळी ज्या त्या विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक लावून प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील असे ठाम आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यानी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपले तूर्तास आंदोलन स्थगित केले आहे.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे उपस्थीथ होतै.
आक्रोश आंदोलनात लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे पदाधिकारी
तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, विलास कदम, सुरेश आप्पा नागप, राजु नागप, हिरालाल गुरव, अशोक नागप, प्रसन्न नागप, अशोक सावंत, धोंडु नाना नागप, शांताराम नागप, विजय भालेकर. राजाराम नागप, अक्षय नागप, विनोद नागप, श्रीकांत बांद्रे, संतोष कांबळे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त आक्रोष आंदौलनात सहभागी झाले होते.
कार्यकारी अभियंता हर्षल यादव आणि आगलावे ज्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी यावेळी तिव्र संताप व्यक्त केला.
No comments:
Post a Comment