ठाणे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक " खान्देश सुपुत्र" कल्याणजी घेटे यांना " राष्ट्रपती गुणवत्ता पोलीस पदकाने " सन्मानित.!
(पालक मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पदक स्वीकारताना श्री. कल्याणजी नारायण घेटे)
भिवंडी, दिं,16,अरुण पाटील (कोपर) :
ठाणे वाहतूक शाखे अंतर्गत येणाऱ्या भिवंडीतील नारपोली -अंजूरफाटा उपवाहतूक शाखेत ईमाने - इतबारे आपले कर्तव्य बजावनारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कल्याणजी नारायण घेटे यांना 15 ऑगस्ट 2021 या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी "राष्ट्रपती पोलीस पदक" देण्यात आले आहे. श्री.कल्याणजी घेटे हे आपल्या कर्तव्य काळात स्वतः येथील चौका -चौकात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवत असून त्यांनी येथील बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक नियमांचे चांगले धडे दिले आहेत. त्यांनी पावसाळ्यात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यानमुळे वाहतूक संथ गतीने होऊन वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चातून रस्त्यात पडलेले खड्डे जे.सी. बी.च्या साहाय्याने बुजवून घेतल्यामुळे वाहतूक कोंडीला चांगलाच आळा बसला आहे.
तसेच ठाणे जिल्ह्यातील कोळशेवाडी येथे आपल्या कार्यकाळात संस्मरणीय व कौतुकास्पद कामगिरी केल्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकश्री. कल्याणजी नारायण घेटे यांना गुणवत्ता सेवेसाठी "राष्ट्रपती गुणवत्ता पोलिस पदक" देण्यात आले आहे. "राष्ट्रपती गुणवत्ता पोलिस पदक" मिळवणारे हे भिवंडी तालुक्यातील वाहतूक शाखेचे पहिलेच अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या पुरस्कारा बद्दल ठाणे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यामधूनही त्याचे अभिनंदन व कौतुक होऊन त्यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत.अतिसंवेदनशील एटीएस ठाणे जिल्हा मध्ये कार्यरत होऊन अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या निष्कलंक अधिकारी म्हणून त्यांचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतले जात आहे .
दरम्यान स्वातंत्रदिनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालक मंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते कल्याणजी घेटे यांना "राष्ट्रपती पोलीस पदक" देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. या प्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त श्री जयजीत सिंग , मा.जिल्हाधिकारी यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. देशात सर्वात महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार मला मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. केंद्र सरकारने माझ्या कार्याची दखल घेतली या बद्दल मी सरकारचा आभारी आहे तसेच हा पुरस्काराच्या माध्यमातून या पुढेही अधिक कार्य करण्याची जबाबदारी वाढली असून भविष्यातही कर्तव्य व जबाबदारी सांभाळत कार्यात सातत्य टिकवून ठेवेन. "वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. कल्याणजी नारायण घेटे".- नारपोली, उपवाहतूक शाखा --अंजूर फाटा)
No comments:
Post a Comment