सर्पदंश झालेल्या ज्ञानेश्वरीला वाचवणार्या माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. इंगोले आणि वैद्यकीय टीमचे दक्षिण रायगड मध्ये सर्वत्र कौतुक !!
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील रोवळा गावच्या कुमारी ज्ञानेश्वरी रमेश शिगवण या अठरा वर्षांच्या तरुणीला गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी गुरांच्या गोठ्यात काम करत असताना अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने तीला तिच्या पालकांनी प्राथमिक उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय तळा येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलवण्यास सांगितले.
परंतु त्या वेळेस तिथून तीला ताबडतोब माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते, तळा येथील रुग्णवाहिका (अँम्ब्युलन्स) दुसऱ्या पेशंटला घेऊन गेल्याने अँम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने तळा येथील कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य तत्पर पोलीस अंमलदार अनंत प्रभाकर घरत तळा पोलीस ठाणे यांनी प्रसंगावधान राखून व समयसूचकता दाखवून त्या सर्पदंश बाधीत मुलीस क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन माणगाव जिल्हा रुग्णालय येथे दाखल कले.
माणगांव उपजिल्हा रुग्णालयाने तिला तात्काळ ॲडमिट करून तिच्यावर माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य तत्पर कार्यक्षम वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रदिप इंगोले यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विषाचा प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील डॉक्टर ऐश्वर्या गायकवाड व वैद्यकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून तिच्यावर तात्काळ उपचार केले. ज्ञानेश्वरीच्या शरीरात पसरलेल्या विषावर ॲन्टीव्हेनम च्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून तिचे अनमोल प्राण वाचविले. आणि तीला डॉक्टर प्रदिप इंगोले आणि त्यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करत देवदूत होऊन साक्षात मृत्यूच्या दारातून सहीसलामत परत आणले. त्यामुळे तिचे अनमोल प्राण वाचले. त्यामुळे ज्ञानेश्वरीला जीवदान मिळाले असून आता तिची तब्येत व्यवस्थित आहे.
त्यामुळे ज्ञानेश्वरीचे पालक व कुटुंबियांनी, तिचे नातेवाईक, तळा तालुक्यातील जनतेतून आणि माणगांव तालुक्यातील जनतेतून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदिप इंगोले आणि डॉ ऐश्वर्या गायकवाड यांचे समाजातील सर्व स्तरातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसत आहे.
माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदिप इंगोले यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्या पासून त्यांनी प्रामाणिकपणे आरोग्य सेवेत स्वतः ला वाहून घेतले असून त्यांनी आजवर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रकारच्या आव्हानांचा धीरोदात्तपणे सामना करत माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दक्षिण रायगड जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोवीड १९ या जागतिक महामारी च्या निर्मूलनासाठी शासनाने अवलंबिलेल्या कोवीड संसर्ग प्रतिबंधात्मक उपचार आणि आणि वैद्यकीय उपाययोजना माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दक्षिण रायगड जिल्ह्यातील जनतेला तत्परतेने मिळाल्या पाहिजे या साठी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ प्रदिप इंगोले गेली दोन वर्षे अहोरात्र स्वतः जातीने लक्ष देऊन काम करत आहेत. त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला डॉ प्रदिप इंगोले यांच्या रुपाने एक कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर आणि कार्यक्षम वैद्यकीय अधिक्षक लाभला आहे. हे तमाम माणगांव करांचे आणि संपूर्ण दक्षिण रायगड मधील जनतेचे भाग्य आहे. असे सर्व जनतेस वाटत आहे. त्यांच्या वैद्यकीय कार्य तत्परतेमुळे माणगांव उपजिल्हा रुग्णालय दक्षिण रायगड मधील जनतेस संजीवनी ठरत आहे. डॉक्टरांच्या नेक व प्रामाणिक वैद्यकीय कामगिरी चे दक्षिण रायगड मधी सर्व जनमानसात सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment