युवा झुंजार मित्र मंडळ आमडोशी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण !!
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी युवा झुंजार मित्र मंडळ आमडोशी या मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा आमडोशी आणि अंगणवाडी आमडोशी येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि अंगणवाडी आमडोशी साठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्र माता जिजाऊ, आणि महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
तसेच उपरोक्त मंडळाच्या वतीने आमडोशी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास मंडळाचे सदस्य आणि मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. राजेश पुंडलीक घुलघुले, अध्यक्ष शशिकांत र. घुलघुले, सल्लागार गणेश वसंत घुलघुले, आमडोशी ग्रामस्थ मंडळांचे अध्यक्ष श्री गणेश चंदर घुलघुले, उपाध्यक्ष रमेश सकपाळ, पोलीस पाटील संजय पा वाघ, आमडोशी गाव मुंबईकर अध्यक्ष देवजी बोटेकर, पाणी कमिटी अध्यक्ष बाबुराव नासकर, ग्रुप ग्राम पंचायत सदस्य सौ कासारे, सौ निशा सकपाळ, शाळेचे मुख्याध्यापक काप सर, पाटील मॅडम, उभारे सर ,बक्कम सर, अंगणवाडी सेविका शशिकला पुडलीक घुलघुले, माजी सरपंच मोतीराम घुलघुले, किशोर शिगवण ,विनोद घुलघुले,राजू कासरे, नामदेव घुलघुले, मनोज सोनकर, तसेच पत्रकार विश्वास गायकवाड सर आणि अजित शेडगे सर उपस्थित होते.
युवा झुंजार मित्र मंडळाच्या सदर कार्यक्रमात वरील सर्व मान्यवरांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविल्या बद्दल त्या सर्वांचे मी मराठी प्रतिष्ठान रायगड संस्थापक आदेशजी लाड, अध्यक्ष समीर टाकले, शिल्पकार क्लासेस सागर ईप्ते, आमडोशी स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर व महिला मंडळ आणि युवा झुंजार मित्र मंडळ आमडोशी यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment