कल्याण ची जलपरी श्रावणी जाधव सत्कार समारंभ संपन्न !!
कल्याण, प्रतिनिधी :-
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील जलतरण या खेळा मध्ये विशेष प्राविण्य आणि कामगिरी करणाऱ्या जलतरण पट्टू आणि पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार समारंभ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता...
यामध्ये प्रामुख्याने कल्याणची जलपरी म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शुभम वनमाली, अश्विनकुमार, नील शेकटकर, मंत्रा कुऱ्हे यांचा स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री दीपक मेजारी व उपाध्यक्ष श्री संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उमेश उत्तेकर किरण फाटक, राजेश गावडे, संकेत सावंत, निमेश भोई, रुपाली रेपाळे, पंकज राठोड, अंनिरुद्ध महाडिक, शशिकांत काळे, चंद्रशेखर निबरें, स्वतेज कोळंबकर, डॉक्टर तृप्ती कुऱ्हे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment