Sunday, 22 August 2021

"शिवचरित्राच्या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल”!

"शिवचरित्राच्या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल”!


टिटवाळा, उमेश जाधव -: शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शकोत्तर वर्षात पदार्पण केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासुन समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालायं. या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाच्या हाताचे ठसे टिटवाळा येथील संस्कृती संग्रहालयात संग्रहीत करण्यात आले असून ते सगळ्यांनाच पहायला मिळणार आहेत.  


गेली ७ दशकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा बाबासाहेब पुरंदरे कधी शिवचरीत्राच्या माध्यमातुन तर कधी जाणता राजा महानाट्यातुन, कधी व्याख्यानातुन तर कधी शिवकल्याण राजाच्या  माध्यमातुन जागर करताहेत. शुक्रवार दि. २० ॲागस्ट रोजी संस्कृती संग्रहालय, 


टिटवाळासाठी याच शिवशाहिरांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. पुण्याला बाबासाहेबांच्या निवासस्थानी मुर्तीकार प्रशांत गोडांबे, संस्कृती संग्रहालयाचे संचालक अविनाश हरड, संकल्पक ॲड. जयेश वाणी व संग्रहालयाच्या कायदेशिर सल्लागार दिव्या ठाकुर यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या हाताचे ठसे आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.


श्रीमहागणपतीच्या टिटवाळा या पावन नगरीत संस्कृती संग्रहालय आकाराला येत आहे. याच संग्रहालयात महारष्ट्राच्या समाजकारणात, कलाक्षेत्रात, क्रिडाक्षेत्रात, धार्मिकक्षेत्रात व राजकारणात महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिंच्या हातांचे ठसे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा म्हणुन संवर्धित करण्याचे काम सुरु आहे. जगातील या एकमेव अशा प्रकारच्या संग्रहालयात आता बाबासाहेबांचे प्रेरणादाई हात सगळ्यांनाच पहायला मिळतील.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...