संपर्क बालग्राम अनाथ आश्रमातील मुलींनी पोलिसांना पोलिसांना राखी बांधून केला रक्षाबंधन सण साजरा !!
लोणावळा : रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भावाकडे जाऊन त्याला राखी बांधून आपले रक्षणासाठी साकडे घालत असते. मात्र, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवाना या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही. यासाठी दरवर्षी संपर्क बालग्राम व महिला दक्षता समितीच्या वतीने पोलीस बांधवाना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला जातो.
यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, शहरचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बाविस्कर व सर्व पोलीस कर्मचारी तसेच मावळ महिला दक्षता समितीच्या रतन देशमुख, आरती देशमुख, लता गायकवाड, सुनिता देवकर, युसुफ इनामदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संपर्क संस्थेचे प्रमुख अमितकुमार बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश माळी, प्रदीप वाडेकर, शीतल सोनवणे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment