Sunday, 22 August 2021

केंद्रीय " पंचायत राज " राज्यमंत्री कपिल पाटील झाले दिवे -अंजूर ग्रामपंचायत खुर्ची समोर नतमस्तक.!!

केंद्रीय " पंचायत राज " राज्यमंत्री कपिल पाटील झाले दिवे -अंजूर ग्रामपंचायत खुर्ची समोर नतमस्तक.!!


अरुण पाटील (कोपर), भिवंडी, दिं, 22 :
          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्य मंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच ठाणे जिल्ह्यात केंद्रीय "पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील" यांनी पाच दिवसात विविध ठिकाणी  भेटी दिल्या.यावेळी "जन आशीर्वाद" यात्रे मध्ये सहभागी झालेल्या जनतेने त्यांना भर भरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी आपल्या दिवे -अंजूर ग्रामपंचायत मधील खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले.
      मंत्री श्री. कपिल पाटील यांच्या "जन आशीर्वाद" यात्रे दरम्यान आगरी -कोळी समाजाने दिलेल्या भर भरून प्रेमामुळे आता त्यांना मागे फिरून बघण्याची गरजच नाही, तसेच ईतर समाजही सहभागी झाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत होते. त्यांच्या कडून या समाजासाठी व ईतर समाजासाठी "पंचायत राज" च्या माध्यमातून तसेच "राज्य मंत्री" च्या माध्यमातून  काही ठोस करून दाखवण्याची संधी चालून आलेली आहे, त्यानी ते सार्थकी लावावे असे तज्ञ राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
         केंद्रीय मंत्री श्री. कपिल पाटील यांनी  राजकारणाला भिवंडी तालुक्यातील आपल्या दिवे -अंजूर गावातुन सरपंच पदापासून सुरुवात करून केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. मंत्री कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय मंत्री पदाची खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही दिवे -अंजूर गावाची " सरपंच पदाची " खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश होते. म्हणून या खुर्ची समोर मा.मंत्री श्री. कपिल पाटील हे विनम्रपणे  हात जोडून नतमस्तक झाले.
               कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते त्या गावचे सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील यांनी नंतर, पंचायत समिती, जिल्हापरिषद व भिवंडी खासदार ते थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत प्रवास केला.
         हे जे ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावनिक भावना त्यांनी या वेळी जमलेल्या ग्रामस्थांसमोर व्यक्त केली. तेंव्हा त्यांना गहिवरून आले होते. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...