शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून गणोशोत्सव साठी मोफत बस सेवा !!
कल्याण : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याऱ्या कोकणवासीयांना मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोशोत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. डोंबिवलीशिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक (9820390165), संतोष चव्हाण (9769446413), सागर जेधे (9224444433) यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment