Saturday, 21 August 2021

अखेर मनसे सैनिकांनकडून "खळखट्याक" भिवंडीतील खारबाव- मालोडी टोलनाका फोडला.!!

अखेर मनसे सैनिकांनकडून  "खळखट्याक" भिवंडीतील खारबाव- मालोडी टोलनाका फोडला.!!


अरुण पाटील, (कोपर) भिवंडी, दि.२१ :
              मनसे जिल्हाध्यक्षांनी चार दिवसापूर्वी खड्डे बुजविण्याचे अल्टिमेट देऊनही रस्त्यावरील खड्डे जैसे थे असल्याचे पाहून अखेर  भिवंडी तालुक्यातील खारबाव - मालोडी टोलनाका खळ्खट्याक करून मनसेसैनिकांनी फोडल्याची घटना घडली आहे. मात्र, अचानक टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांचा धुडघूस पाहून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी यावेळी पळ काढला होता.
            जिल्ह्यात विविध शहरात पावसामुळे खड्ड्यांनी डोके वर काढले असून त्यातच भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा मार्गावरील  रस्ता खाजगीकरणातून बनविण्यात आला. मात्र, या  मार्गाची खड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली होती. याच खड्यांच्या विरोधात मनसेही रस्त्यावर उतरली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चार दिवसापूर्वी टोल नाका प्रशासनाची भेट घेऊन  या रस्त्या बाबत गांभीर्य बाळगून दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशाराही दिला होता.
          केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामे ठेकेदारांमुळे निकृष्ट व संथगतीने होत असल्याचा आरोप केला होता. त्याचाच हवाला देत मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवसह प्रदेश उपाध्यक्ष डी.के.म्हात्रे  यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली होती.भिवंडी तालुक्यातील रस्त्यावरील खड्यांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांच्या गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली 18 ऑगस्ट रोजी चार ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
         भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण–चिंचोटी फाटा पर्यंतचा खाजगीकरणातून बनविण्यात आलेल्या मार्गाची खड्यामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक बळी गेलेल्या निष्पापांची राज्यशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित करीत चांगले रस्ते बनवा अन्यथा टोल वसुली बंद करा असा इशारा अविनाश जाधव सह मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे  यांनी दिला होता.मात्र रस्ता दुरुस्त न झाल्याने अखेर मनसे कडून " खळ खट्याक " करण्यात आले     
          दरम्यान, टोलनाका तोडफोड प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत टोलनाका व्यवस्थापकाने दिले होते.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...