मुखमंत्र्यांनी मला परवानगी द्यावी, मी बाळासाहेबांचं दर्जेदार स्मारक बांधून दाखवील, राणेंची घोषणा.!!
अरुण पाटील, (कोपर) भिवंडी, दि. २१ :
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. 'मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी मी माझ्या पैशाने दोन महिन्यात दर्जेदार स्वरूपाचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधून दाखवील' अशी घोषणाच आज नारायण राणेंनी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिवादन केल्यावर स्थानिक शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाची साफसफाई करत शुद्धीकरण केलं तसेच गोमुत्र शिंपडून दुग्धाभिषेकही केला होता. त्यानंतर आज मुंबईतील जोगेश्वरीमध्ये नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा निघाली होती. यावेळी बोलत असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला.
मी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांकडून शुद्धीकरण करण्यात आलं. पण, मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी मी माझ्या पैशाने दोन महिन्यात दर्जेदार स्वरूपाचं बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक बांधून दाखवील' अशी घोषणाच राणेंनी केली.
३२ वर्षात फक्त मुंबईची अवस्था बकाल सारखी झाली. मुंबई शहराला जागतिक किर्तीच शहर अजून बनवण्यात आल नाही. देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू फक्त एकट्या महाराष्ट्रात झाला. माझ्या आयुष्यात पहिले असे मुख्यमंत्री असतील ते घरात बसून काम करत आहेत, अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
तसंच, हे महाविकास आघाडी सरकार अंतर्गत असलेल्या वादामुळे पडणार आहे. आम्हाला सरकार स्थापनेचा मुहूर्त काढायला अजून ज्योतिषी मिळाला नाही. मात्र, आम्ही लवकरच ठरवू' असं सूचक वक्तव्यही राणेंनी केलं.
मी मुंबईत फिरतोय मला उदंड असा प्रतिसाद दिसत आहे. मी माझ्या खात्यामुळे दरडोई उत्पन नक्की वाढेल. माझ्यात खात्या संदर्भात मी ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रात सुरू करणार आहे. माझ्या खात्या अंतर्गत 1 कोटी पासून 250 कोटीपर्यंत उद्योग धंदे करता येणार आहे' असं आश्वासनही राणेंनी दिलं.
No comments:
Post a Comment