Saturday, 21 August 2021

आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली ची मागणी खाजगी शाळांनी शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याच्या शासनाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे !!

आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली ची मागणी खाजगी शाळांनी शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याच्या शासनाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे !!


कल्याण : शिक्षण संस्थांमध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचे निर्देश शासनाने दिले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यास कल्याण डोंबिवली शहरातील अनेक शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहेत. अशा मुजोर शाळांकडून या शासन निर्णयाची अंमबजावणी करून घेण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रमुख शाळांना देखील याबाबत निवेदन देण्यात येत असल्याचे आपचे कल्याण शहर अध्यक्ष तथा कामगार नेते कोणार्क देसाई यांनी सांगितले.

कोविड-१९ च्या महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गोरगरीब नागरिकांचे नोकरी-व्यवसाय हिरावले गेले. कल्याण-डोंबिवली शहरातील लाखो कुटुंबांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. कोविडच्या लागण कमी होत असताना जनजीवन पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी जाणार आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था शाळा व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. तसेच शाळा-महाविद्यालये देखील सुरु होण्याची स्थिती पाहता शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्याकडून शालेय शुल्क आकारणी करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र आर्थिक कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या गरीब-मध्यमवर्गिय कुटुंबांना पाल्यांचे शाळा शुल्क कसे भरायचे याची विवंचना भेडसावत आहे. याची दखल घेत शासनाने शाळा व्यवस्थापनांनी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी असे निर्देश दिले आहेत. मात्र अनेक मुजोर शिक्षण संस्था या निर्देशाची पायमल्ली करीत पूर्ण शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी आल्याने त्याची दखल घेत आम आदमी पक्षाचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी तडवी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

कल्याण डोंबिवली शहरातील विनाअनुदानित-कायम विनाअनुदानित शाळांनी शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याच्या शासनाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे किंवा कसे याकडे लक्ष द्यावे व पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत कल्याण डोंबिवली निवडणूक प्रचार समितीचे सिद्धार्थ गायकवाड,  निलेश पांडे, प्रभाग ३५ चे अध्यक्ष फाईज मुल्ला, उमेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षण संस्थाना देखील निवेदन....

कल्याण डोंबिवली शहरातील प्रमुख १०-१२ शाळांना देखील याबाबत निवेदन देण्यात येत असल्याचे आपचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष तथा कामगार नेते कोणार्क देसाई यांनी सांगितले. प्रमुख शाळांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार आहोत. ज्या शाळा निवेदन स्वीकारणार नाहीत त्यांना पोस्टाने पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...